मुंबई : सरकारकडून बँक खाते, पासपोर्ट, मोबाईल नंबरप्रमाणे रेशनकार्डही आधारशी जोडणे बंधनकारक आहे. येत्या १ मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयाविरोधात जनहित याचिका मुंबई कोर्टात दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली.


स्वस्त दरात धान्य


कोर्टाने बायोमेट्रिक रेशनकार्ड अनिवार्य असल्याचे सांगताना रेशनकार्डला आधारशी जोडणे योग्य असल्याचे मत मांडले. आधारला रेशनकार्डशी लिंक केल्यानंतर ते बायोमेट्रिक रेशनकार्ड होईल ज्यामुळे १ मार्चनंतर रेशनच्या दुकानांवर लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध होईल.


कोर्टाने फेटाळली याचिका


नाशिकमध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते अजीज पठाण यांनी यासंबंधित जनहित याचिका दाखल केली होती. आधारला रेशनकार्डशी लिंक करताना प्रशासनाकडून अनेक चुका होत आहेत. एकट्या नाशिकमध्ये ७४ हजाराहून अधिक त्रुटी समोर आल्या. त्यामुळे आधारला रेशनकार्डशी लिंक करणे अनिवार्य करु नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.