मुंबई : महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना आणखी एक झटका लागण्याची शक्यता आहे. कर्जदारांच्या खिशाला आणखी कात्री लागू शकते. येत्या बुधवारी पुन्हा एकदा कर्जाचे हप्ते महागू शकतात. रिझर्व्ह बँक 8 जून रोजी पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. यावेळी रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. (rbi may once again increase the emi rate know how much your expenses will increase)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या काळात रिझर्व्ह बँकेनं केलेली व्याजदरातील कपात मागे घेण्याच्या प्रक्रियेला गेल्या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. 


चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आलेलं रशिया-युक्रेन युद्धाचं संकट, त्यानंतर उसळलेला महागाईचा भडका यामुळे व्याजदरात दोन वर्षांपूर्वी केलेली कपात मागे घेण्याशिवाय पर्याय नाही, असं गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आधीच स्पष्ट केलंय. येत्या काळात रिझर्व्ह बँक नेमका काय पवित्रा घेणार याकडेही अर्थतज्ज्ञ डोळे लावून बसलेयत.