मुंबई पालिकेत मेगाभरती, १,३८८ कर्मचाऱ्यांची होणार नेमणूक
मुंबई शहरात सरकारी नोकरीची संधी चालून आलेय. तुम्ही तात्काळ अर्ज करण्याच्या तयारीत राहा. कारण मुंबई महानगरपालिकेत मेगाभरती करण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षांत प्रथमच एवढी मोठी भरती होत आहे.
मुंबई : शहरात सरकारी नोकरीची संधी चालून आलेय. तुम्ही तात्काळ अर्ज करण्याच्या तयारीत राहा. कारण मुंबई महानगरपालिकेत मेगाभरती करण्यात येणार आहे. गेल्या आठ वर्षांत प्रथमच एवढी मोठी भरती होत आहे.
मुंबई महापालिकेत चतुर्थश्रेणी कामगारांची ही भरती आहे. पालिकेच्या विविध विभागांतील तब्बल १,३८८ जागांसाठी भरती करण्यात येत आहे. ही भरती संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा संयुक्त उपक्रम असलेल्या महाऑनलाइन लिमिटेड कंपनीमार्फत ही भरती केली जाणार आहे.
या मेगाभरतीची लवकरच जाहिरात देण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनुसार या भरतीबाबतची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. पालिकेच्या जलविभाग, आरोग्य खाते, रुग्णालये, मलनि:सारण या अत्यावश्यक विभागांमध्ये कामगारांची अनेक पदे रिक्त आहेत.
ही सर्व पदे सरळ सेवेने भरली जाणार आहे. दरम्यान, कामगार, कक्षपरिचर, हमाल, आया, स्मशान कामगार प्रवर्गांतील अशी १,३८८ पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी लेखी अर्ज जास्तीचे येण्याची शक्यता असल्याने ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
या विभागात होणार भरती
- मुंबई प्रकल्प ३-ए - १८
- मुंबई प्रकल्प (बांधकामे) - ७६
- पाच प्रमुख रुग्णालये - ८०
- उप जलअभियंता (परिरक्षण) - २६०
- उप जलअभियंता (प्रचालने) - ३७
- उप जलअभियंता (पिसे पांजरापोळ) - ४८
- उप जलअभियंता (भांडुप) - २६
- विभागीय कार्यालयातील पाणी विभाग - २७८
- मलनि:सारण - ४९६
- आरोग्य विभाग (स्मशानभूमी) - ६९