मुंबई :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान,  नारायण राणे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार यामुळेच शिवसेनेत अस्वस्थता वाढली असून त्याचमुळे ही भेट घेतली गेल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.  शिवसेनेने भाजपला विविध मुद्द्यांवर विरोध केला. भाजप हा विविध पातळींवर शिवसेनेला कमजोर करत असल्याची भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली आहे. 


नारायण राणे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली तर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीत बसावे लागेल. त्यामुळे हे होता कामा नये, तसेच राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येऊ नये यासाठी दबाव म्हणून ही उद्धव ठाकरे यांनी खेळी केली असावी असेही जाणकारांचे मत आहे. 


काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिलाय. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे.


 तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले.


गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. 


या निमित्ताने उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांसाठी भाजप विरोधी मोट बांधली जाते का याची चाचपणी या निमित्ताने सुरू आहे. 


सध्याचे पक्षीय बलाबल 


एकूण जागा २८८ 


भाजप १२२ 


शिवसेना ६२ 


राष्ट्रवादी ४१


काँग्रेस ४२


अपक्ष ७


इतर १४