मुंबई : महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aaghadi Government) ख्रिसमस आणि नववर्षासाठी वसूलीचं षडयंत्र आखलं आहे असा गंभीर आरोप भाजपचे आमदार अमित साटम (BJP MLA Amit Satam) यांनी केला आहे. उत्पादन शुल्क विभाग, पोलिस, आरोग्य विभाग आणि मुंबई महापालिकेला 1 हजार कोटी वसुलीचा टार्गेट देण्यात आल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर हे वसुलीचं काम मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचा आरोपही साटम यांनी केला आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आपल्या गृहमंत्री पदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. हे प्रकरण ताजं असतानाच आता आमदार अमित साटम यांनी गंभीर आरोप केला आहे.


अशी करणार वसूली
मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना आमदार अमित साटम यांनी सरकार ही वसूली कशी करणार हेही सांगितलं. आता ख्रिसमस आहे, त्यानंतर  नविन वर्ष येत आहे. याकाळात क्लब, रेस्टॉरंट, बारमधून वसुली केली जाईल, तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी करत असात तर तितेही महापालिका किंवा पोलीस धडकतील, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.