मुंबई : इस्लामपूर येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. त्याला मनसेकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे म्हणजे बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमातील 'अर्धवटराव' आहेत, असा टोला लगावला होता. 


राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याच सभेत संपूर्ण हनुमान चालीसा एका दमात म्हणून दाखविली. तसेच, आम्हीही हिंदू आहोत.. नाद नाय करायचा असं आव्हान दिलं होतं. 


या आव्हानाला मनसेनं जोरदार प्रत्त्युत्तर दिलंय. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये त्यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना 'संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले.' याची आठवण करून दिलीय.



राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत असली तरी राज ठाकरे यांच्यामुळेच भर सभेत हनुमान चालीसा म्हणावी लागली याकडे गजानन काळे यांनी लक्ष वेधलंय.