मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यात कोरोना व्हायरसचा Coronavirus शिरकाव झाल्याची माहिती समोर आली आहे. रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने रेखा यांच्या बंगल्यासह संपूर्ण परिसर सील केला आहे. वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी स्प्रिंग हा बंगला आहे. या बंगल्याच्याबाहेर एक नोटीस लावली आहे. या नोटीसमध्ये कंटेनमेंट झोन असा उल्लेख करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#Breaking: अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात दाखल

यापूर्वी बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर अभिनेता आमिर खानचे दोन अंगरक्षक आणि एका स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून आमिर खानसह त्याच्या कुटुंबीयांची तातडीने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. 

दरम्यान, काहीवेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विटरवरुन आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले.