मुंबई : इकबाल कासकरच्या चौकशीतत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक आणि दाऊद इब्राहिमचे लागेबांधे असल्यची माहिती कासकरनं आयबीला दिली आहे. दाऊदनं झाकीर नाईकच्या संस्थेला आर्थिक मदत दिल्याचं कासकररनं सांगितलं आहे. त्यासाठी हवालाचा वापर झाल्याचंही इकबालचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदनं नाईकची मदत करण्यासाठी कराची, यूके, सौदी अरेबिया आणि दक्षिण अफ्रिकेतल्या उद्योगांच्या माध्यमातून पैसे फिरवल्याचं बोललं जातं आहे. 2012 पासूनही  पैशाची देवाणघेवाण सुरू असल्याचं कासकरनी सांगितलं आहे. दरम्यान झाकीर नाईकला मिळालेला पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता का? याविषयी इकबालनं माहिती देण्यास नकार दिला आहे.


इकबालच्या या गौप्यस्फोटानं पाकिस्तानचाही बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. साऱ्या जगात वहाबी दहशतवादाचा प्रसार करणाऱ्या झाकीर नाईकला रसद पुरवणारा दाऊद पाकिस्तानातून हे नेटवर्क चालवतोय हे या गौप्य़स्फोटानं स्पष्ट झालं आहे.