मुंबई : बहुचर्चित रिलायन्स जिओच्या फोरजी फोनचा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. रिलायन्स जिओने अवघ्या दीड हजार रुपयांत हा फोन बाजारात आणल्याने चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोन रिलायन्स जिओ 4 जी सारखाच अनेक प्रकारच्या इंटरनेट सेवेसाठी ग्राहकांना महत्वाचा वाटतो, मात्र या मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचं वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिलं आहे.


जिओच्या या वृत्तामुळे मोबाईलची प्री बुकींग करणाऱ्या ग्राहकांना धक्का बसणार आहे. काश्मीरमधील एका ग्राहकाने या फोनचा स्फोट झाल्याचे फोटो ट्विटरवर टाकले आहेत. 


या फोटोत रिलायन्स मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने त्याचा पाठचा भाग वितळल्याचे दिसत आहे. या संबंधीचं वृत्त एका हिंदी न्यूज पेपरने दिलं आहे.


दरम्यान, रिलायन्स कंपनी जिओ फोनचा स्फोट झाला नसल्याचं सांगत, ही घटना नाकारली आहे. तरी गेल्यावर्षी देखील रिलायन्सच्या लाईफ स्मार्टफोनचा स्फोट झाला होता. तन्वीर सिद्दीकी या व्यक्तीच्या लाईफ स्मार्टफोनचा स्फोट झाला, तेव्हा तो फोटो देखील त्याने सोशल मीडियावर टाकला होता.


रिलायन्सने जून महिन्यात वार्षिक बैठकीत जिओच्या फोरजी मोबाईलची घोषणा केली. त्यानंतर तब्बल 8.5 ग्राहकांनी या मोबाईलसाठी प्री बुकींग केले असून ऑगस्ट महिन्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे.


'रिलायन्स जिओचे सर्व फोन हे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून तयार केले आहेत. त्यामुळे या मोबाईलचा स्फोट होणे शक्य नाही. मात्र स्फोट झाल्याची घटना आमच्या कानावर आली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा या मोबाईलच्या दर्जाची तपासणी करू', असे रिलायन्सच्या प्रवक्त्याने सांगितले.