मुंबई : आंतरजिल्हा बंदी हटवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू व्हावी अन्यथा आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. महाराष्ट्र प्रगतिशील राहिलेला आहे पुढाकार घेणारा महाराष्ट्र आहे. या प्रतिमेला आघाडी सरकारने डागाळू नये. राज्य शासनाने आंतर जिल्हा बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी केली. आम्ही जगावं की मरावं याचा सरकार ने विचार करू नये असे ते पुढे म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनलॉक काळात अकोल्यातील मंदिर आम्ही खुल केलं. पंढरपूर येथे संत आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत मी देखील आंदोलनात उतरणार असल्याचा शब्द मी त्यांना दिलाय. तसेच राज्यातील मंदिर खुली व्हावीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे केलीय.


स्वतःच्या बेस्ट असताना कंत्राटदाराच्या बेस्ट का चालवल्या जात आहे ? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारला विचारलाय. एसटीची वाटचाल खाजगीकरणाकडे सुरू असल्याचेही ते म्हणाले. बेस्ट आणि एसटी कर्मचाऱ्यांना रोज डेपोला हजेरी लावावी लागत असल्याचे ते म्हणाले.



पार्थ पवार नाराजी प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांनी या आधी अजित पवार यांना फटकारल होत. आता पार्थ पवारला फटकारलं. याच गौडबंगाल त्यानांच माहीत असे आंबेडकर यावेळी म्हणाले.