मुंबईतल्या मनोरा आमदार निवासातील नूतनीकरण थांबवले
धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलकिडे गेलेल्या मुंबईतील मनोरा आमदार निवासात चक्क नुतनीकरणाचे काम सुरू असल्याची बातमी झी 24 तासने गुरुवारी दाखवली होती. बातमी दाखवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने धावपळ करत आता हे काम थांबवले आहे.
मुंबई : धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलकिडे गेलेल्या मुंबईतील मनोरा आमदार निवासात चक्क नुतनीकरणाचे काम सुरू असल्याची बातमी झी 24 तासने गुरुवारी दाखवली होती. बातमी दाखवल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने धावपळ करत आता हे काम थांबवले आहे.
दोन महिन्याच्या आत मनोरा आमदार निवास इमारत रिकामी केली जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असं असतांनाही मनोरा आमदार निवासांत बी विंगमध्ये १२ व्या मजल्यावर तसंच आणखी काही ठिकाणी चक्क नुतनीकरणाचे काम सुरु होते. यासाठी नव्या टाईल्स, रेती, सिमेंटच्या पोती या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत.
नूतनीकरणाचे कंत्राट निर्णय घेण्याआधीच देण्यात आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केलाय. मात्र इमारत रिकामी करण्याचा निर्णय झाल्यावरही कंत्राटाची बिले चुकती करण्यासाठी ही कामे सुरू होती हे यावरून स्पष्ट होते. मात्र बातमी दाखवताच सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम थांबवले आहे.