मुंबई : एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेने 13 टीम्सच्या माध्यमातून विविध रेल्वे स्थानकांवरील गर्दी, त्याचं नियोजन, पादचारी पूल, प्रवासी सुरक्षितता यांचा आढावा घेतला. त्याचा पाहणी अहवाल मध्य आणि पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकांना सुपूर्द करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या एक ते दोन दिवसांत हा अहवाल दिल्ली रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी काय नियोजन आणि सुधारणा करता येतील हे या अहवालात असणार आहे.