मुंबई : अनेक जणांना जसा चहा लागतो, तसाच चहासोबत टोस्टही (Toast) लागतो. अनेक जण अगदी बाहेर चहाच्या टपरीवरही चवीने टोस्ट खातात. मात्र तुम्ही खात असलेला पॅकेटबंद टोस्ट तुमच्यापर्यंत कसा पोहचतो, हे समजल्यानंतर तुम्ही आत्ताच या क्षणापासून टोस्ट खाणं बंद कराल. त्याचं झालं असं की सोशल मीडियावर (Social Media) एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत हा कामगार टोस्ट पॅक करताना दिसतोय. व्हीडिओतील ही व्यक्ती टोस्ट चाटून पॅक करताना दिसतेय. (Report on Dirty khari and toast bakery video Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा किळसवाणा व्हीडिओ पाहून तुम्हाला संताप आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हीडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अजूनही समजू शकलेलं नाही. या व्हीडिओत पुढे बेकरीत काम करणारे लोक खारी आणि टोस्टला पाय लावत असल्याचं दिसतंय. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटीझन्समध्ये संतापाची लाट उसळलीय.



दरम्यान बेकरीमधील अशा प्रकारचे व्हीडिओ व्हायर होण्याचा हा काही प्रकार नाही. पाव बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. बेकरीतील कामगार हा मैदा पायाने तुडवताना व्हीडिओ याआधी अनेकदा व्हायरल झाला आहे. या अशा प्रकारे सर्वसामन्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यां विरुद्ध प्रशासन काय कारवाई करणार की नाही, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.