नागरी सहकारी बँकांवरील निर्बंधांवर आक्षेप, आंदोलनाचा इशारा
पीएमसी बँकेतल्या गैरव्यवहारानंतर रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांवर निर्बंध आणलेत मात्र हे निर्बंध चुकीचे असल्याचा आरोप होतोय.
मुंबई : पीएमसी बँकेतल्या गैरव्यवहारानंतर रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांवर निर्बंध आणलेत मात्र हे निर्बंध चुकीचे असल्याचा आरोप होतोय. या निर्बंधामुळे नागरी सहकारी बँकांना व्यवहार करणं अवघड जातं आहे. कारण एकुण कर्जाच्या ५० टक्के कर्ज वाटपावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे नागरी बँकेचे कर्जदार इतर बँकांकडे वळतील असा आरोप करण्यात येत आहे.
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झालेले घोटाळे 95 टक्के आहेत, तर नागरी सहकारी बँकेत केवळ 3 टक्के घोटाळे झाले असा अहवाल रिझर्व्ह बँकेने दिल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा घाट रिझर्व्ह बॅंकेने घातला आहे त्यामुळे फेडरेशन याविरुद्ध आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.