दहीहंडीवरील निर्बंध : मुंबईतील गोविंदा पथकाची महाआरती
उत्सवांची चाहूल लागताच आता हळूहळू सांस्कृतिक वातावरण तापू लागले आहे. दहीहंडीवरील निर्बंध उठवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं थेट सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात उद्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : उत्सवांची चाहूल लागताच आता हळूहळू सांस्कृतिक वातावरण तापू लागले आहे. दहीहंडीवरील निर्बंध उठवण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं थेट सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत. त्यासाठी प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात उद्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे.
निर्बंध प्रकरणाची सुनावणी येत्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आहे. त्याआधी भावनिक वातावरण निर्मिती केली जातेय. दहीहंडी उत्सव समन्वय समिती आणि गोविंदा पथकं महाआरतीमध्ये मोठ्या संख्यने महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत.