मुंबई : आजपासून प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. ऑफिसला जायला घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी महत्वाची आहे. रिक्षा (Rickshaw) आणि टॅक्सीतून (Taxi) आज सोमवार 1 मार्चपासून प्रवास करणाऱ्या मुंबई महानगरातील प्रवाशांना नवीन भाडेदर द्यावा लागणार आहे. आजपासून मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. तीन रुपयांनी हा प्रवास महागणार आहे. ((Rickshaw and Taxi Fare Hike) रिक्षाच्या पहिल्या टप्प्यासाठी आता 18 ऐवजी 21 रूपये मोजावे लागणार आहेत. तर टॅक्सीसाठी 22 ऐवजी 25 रूपये मोजावे लागणार आहेत. सहा वर्षांनंतर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. (Rickshaw and Taxi Fare Hike In Mumbai From Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनंतर आजपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाडेदरात ही वाढ करण्यात आली. त्यामुळे ही भाडेवाढ झाली आहे. नवीन भाडेदरासाठी रिक्षा,टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करावे लागणार असल्याने त्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत चालक भाडेदरपत्रकानुसारच प्रवाशांकडून भाडे वसूल करतील. रिक्षा आणि टॅक्सी यांच्या मीटरमध्ये नवीन भाडेदर बदल करण्यास मे 2021 पर्यंतचा कालावधी चालकांना परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. बदल होईपर्यंत चालक नवीन दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेऊ शकतात.


दरम्यान, काळ्या-पिवळ्या टॅक्सींबरोबरच कुल कॅबचेही भाडे आजपासून वाढणार आहे. त्याच्या किमान भाडेदरात पाच रुपयांनी वाढ केली आहे. याआधी कुल कॅबचे दिवसा दीड किलोमीटरसाठीचे किमान असलेले 28 रुपये भाडे 33 रुपये आणि तर रात्रीचे भाडे 35 रुपयांवरुन 42 रुपये होणार आहे. त्यामुळे आजपासून मुंबईतील प्रवास महागला आहे.