भिवंडी : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मध्यरात्रीच्या  3 च्या  सुमारास दरोचा टाकण्यात आला. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात सशस्त्र दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून  हातपाय बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरात प्रवेश करून देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील 3 व बाहेरच्या 2 असे 5 दान  पेट्या  फोडून 10 ते 12 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.  यामुळे वज्रेश्वरी गावात एकच खळबळ उडाली आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी निषेध म्हणून संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गणेशपुरी पोलीस दाखल झाले तसेच डीवाय एसपी दिलीप गोडबोले यांनीही घटनास्थळी भेट दिली. ७ ते ८ लाख रोकड दरोडेखोरांनी लंपास केल्याचं सांगितले आहे. 


व्यवस्थापकाने सांगितले की काही दिवसांपूर्वी यात्रा संपली होती त्यामुळे दानपेटीत जवळपास १० ते १२ लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. सध्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. हा सर्व प्रकार cctv मध्ये कैद झाला आहे.