मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर पर्यंत मुंबईत जमावबंदी लागू राहणार आहे. जमावबंदीच्या काळात ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.  राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनी आज संध्याकाळी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे जमावबंदी म्हणजे लॉकडाऊन नाही असं देखील जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान या जमावबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा, शासकीय-निमशासकीय संस्था आणि त्यांच्याशी संबंधीत संस्था किराणा दुकाण इत्यादी महात्त्वाच्या सेवा वगळण्यात आल्या आहेत. 


मुंबईत दररोज २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे.  बुधवारी २ हजार ३५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ३१ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पावणे दोन लाखांच्या वर पोहोचली आहे.