COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : देशातल्या दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, प्रसंगी भाजपची साथ सोडायला मागे पुढे बघणार नाही, असं आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. झी 24 तास दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी रिपाईंचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना देण्याचीही तयारीही दर्शवली आहे. दलित ऐक्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घेण्याची मागणीही आठवले यांनी केली आहे. शिवाय उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी इच्छा असल्याचंही आठवलेनी म्हटलं आहे. ते त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहेत. 


रामदास आठवले यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे


१) दलित ऐक्याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांनी करावे. मी भाजपची साथ सोडायला तयार आहे !


२) उद्धव ठाकरे यांच्याशी मोदींनी व्यक्तिश: बोलून त्यांची नाराजी दूर करायला हवी. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं.


३) माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा.


४) मी मंत्रीपद सोडावं अशी मागणी करणाऱ्या काँग्रेसने, आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले ?