मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर तोफ डागत त्यांनी आपल्याला शिकवू नये अशा शब्दांत रिपाईच्या रामदास आठवले यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. त्यांनी दलित अत्याचाराविरुद्ध कधीच एक शब्दही काढला नाही, किंवा दलितांवरील अत्याचारांवुरुद्ध ते कधी पुढे आले नाहीत, असं म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलितांवरील अत्याचारांविरोधात आपण कायम पुढाकार घेतल्याचं म्हणत दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये असा टोला आठवले यांनी दिला. राऊतांच्याच एका वक्तव्यावर त्यांनी हा पलटवार केल्याचं पाहायला मिळालं. 


संजय राऊत यांनी रामदास आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना आपण कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो, असा टोला लगावला. 


हाथरस ची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरस च्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला, आंदोलन करत .लखनऊला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो, असं स्पष्टीकरण आठवले यांनी दिली. शिवाय येत्या दिवसांत हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


 


अभिनेत्रीला न्याय मिळवून देण्याबाबत म्हणाले.... 


'दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कलावंतांची कदर करत. त्यांचे अनेक चित्रपट कलाकारांशी चांगले संबंध होते. त्यामुळं एखाद्या अभिनेत्री महिलेवर अतिप्रसंगा इतका अन्याय झाला असताना त्या महिलेची बाजू संजय राऊत यांनी घेतली नाही. कलाकार अभिनेत्री यांना महिला म्हणून सन्मान न देता त्यांना जाहीर अपशब्द वापरले. त्यातून कलाकारांचा सन्मान करण्याची बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती त्या भूमिकेला हरताळ फसण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे', असं आठवले म्हणाले.