मुंबई : कोविड - १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना प्रत्येकी २००० रुपये एवढे अर्थसहाय्यत्यांच्या बँक खात्यात थेट DBT पध्दतीने जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यानुसार ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य शासनाच्या निर्णयानुसार २० मे २०२० पर्यंत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ७,६७,००० नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांच्याखात्यात प्रत्येकी  दोन हजार रुपयांप्रमाणे  १५३ कोटी ४० लक्ष एवढे अर्थसहाय्य जमा करण्यात आलेले आहे. 


लॉकडाऊन कालावधीतील विविध अडचणीमुळे ज्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्याचा तपशील जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त झालेला नाही तोही प्राप्त करुन त्या बांधकाम कामगारांच्या बँक खात्यातही अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.