Mohan Bhagwat : शास्त्रात उच्च-नीचता, विषमतेला थारा नाही : मोहन भागवत
शरद पवारांनी (Sharad Pawar) मोहन भागवतांच्या भूमिकेचं समर्थन केलंय.
मुंबई : शास्त्रात उच्च-नीचता विषमतेला थारा नाही, इतिहासात ज्या चूका झाल्या त्या कबूल करायला काही हरकत नाही अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवतांनी (Mohan Bhagwat) घेतलीय. तर शरद पवारांनी (Sharad Pawar) मोहन भागवतांच्या भूमिकेचं समर्थन केलंय. पाहुयात भागवत नक्की काय म्हणालेत. (rss chief mohan bhagwat says varna and caste system should be discarded)
सरसंघचालक मोहन भागवतांनी सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेसंबंधी महत्त्वाचं विधान केलंय. शास्त्रात जातीभेदाला आधार नाही, पूर्वजांनी केलेली जातीभेदाची चूक कबूल करायला काही हरकत नाही अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलीय.
भागवतांच्या भूमिकेचं शरद पवारांनी समर्थन केलंय, पण भागवतांनी मांडलेले विचार प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गरज असल्याचंही पवारांनी म्हटलंय. भागवतांच्या या विधानावर ब्राह्मण महासंघानं मात्र टीका केलीय. विषमतेला शास्त्रांमध्ये थारा नाही, भूतकाळात घडलेल्या चुका कबूल करायला काही हरकत नाही, असं विधान भागवतांनी केलंय. आता या विधानावर विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.