मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. मध्यरात्रीपासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण या कठिण प्रसंगी नागरिकांचा बेजबबादारपणा वारंवार समोर येत आहे. दारूची दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू राहतील अशी अफवा सध्या पसरवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर अक्षरशः लोकांनी दारूच्या दुकांनाबाहेर गर्दी केली. अखेर पोलिसांना येऊन त्यांना हाकलून द्यावे लागले. करोना वर मात करण्यासाठी संचारबंदी लावली आहे फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत मात्र अशा तळीरामांमुळे करोना पासून कसं लढायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. 



दूध केवळ सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या वेळेतच मिळणार, भाज्या खरेदीची वेळ सकाळी ८ ते ११ अशी ठरवून दिली आहे, किराणा माल, औषधाची दुकानं सकाळी ८ ते ११ या वेळेतच खरेदी करता येईल. असे एक ना अनेक संदेश सोशल मीडियावरून फॉरवर्ड केले जात आहेत.


सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या अफवा पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर मुंबई पोलिसांनी आयुक्तांच्या आदेशावरून ट्वीट करून यावर खुलासा केला आहे.