मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार चांगले काम करीत आहे. हे सरकार सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय देण्याचे काम करेल.  महाविकास आघाडीचं सरकार आले आहे. व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. महाविकासआघाडी सरकार सर्वच कामांना प्राधान्य देईल. तुम्ही परलेल्या बोगस बातम्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात अल्पसंख्यांक सेलची  बैठक झाली. यावेळी अजित पवार यांनी हे आवाहन केले.  महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित कसे चालेल हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु आमच्याबद्दल काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. पण अशा गोष्टीकडे लक्ष देवू नका, असे  अजित पवार म्हणालेत. 


ही बैठक अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,  प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, खासदार माजिद मेमन,अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.



या बैठकीवेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक अफवा आणि चर्चेंना पूर्णविराम दिला. आमच्याबद्दल काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका. सरकार चालवताना अनेक अडीअडचणी आहेत. मात्र तरीही आपल्या विभागाला कोणतीही अडचण येणार नाही,  असा विश्वासही अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाला दिला.