उर्फी नावाच्या विकृतीकडे महिला आयोगाचं दुर्लक्ष का? चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचलाय, उर्फीच्या निमित्ताने चित्रा वाघ यांनी आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे
Chitra Wagh vs Urfi Javed : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Jadhav) यांच्याता वाद आता टोकाला पोहोचलाय. महाराष्ट्रात उर्फी जावेदचा नंगा नाच चालू देणार नाही, असा पुन्हा एकदा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. उर्फीला विरोध नाही, पण तिच्या विकृतीला विरोध आहे. उर्फी मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर उघडेनागडे नंगा नाच करते, इथं धर्माचा विषय नाही, सार्वजनिक ठिकाणी महाराष्ट्रात सुरु असलेल्या विकृतीला विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषेदत चित्रा वाघ बोलत होत्या.
यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी समाजाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे, दुर्देवाने यावर राजकारण सुरु असून उर्फीचे जे समर्थन करतायत ते काय ठेवणार असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. यावेळी चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा (Maharashtra State Women Commission) रुपाली चाकणकरांवर (Rupali Chakankar) जोरदार निशाणा साधला. उर्फी नावाची विकृती दिवसाढवळ्या कपडे न घालता रस्त्यावर फिरते मात्र महिला आयोगाला दिसत नाही का असा सवाल त्यांनी केला. महिला आयोगाने अद्याप हस्तक्षेप का केला नाही, अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, महिला आयोग जबाबदारी विसरले आहेत का असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
वेब सिरिजवरुण अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आणि संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना नोटिस बजावली होती यांना नोटिस पाठवणाऱ्या महिला आयोगाने उर्फी जावेदवर काय करणार, महिला आयोगाच्या अध्यक्षांना तिथं बसण्याचा अधिकार काय, असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
उर्फी जावेद पुन्हा वादात अडकणार
दरम्यान, उर्फी जावेद पुन्हा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. पठाण सिनेमातल्या दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरुन वाद सुरू असतानाच उर्फीनं आता भगवे कपडे घातलेत. दीपिकाच्या भगव्या बिकिनीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असताना उर्फीनं स्वतःचा नवा व्हिडीओ अपलोड केलाय. त्यात ती भगव्या कपड्यांमध्ये दिसतेय. उर्फीच्या कपड्यांवरुन भाजप महिला आघाडी अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली असताना उर्फीच्या या नव्या कपड्यांवरुन पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : Corona मुळे पुरुषांच्या Sex Life वर परिणाम? अभ्यासात धक्कादायक खुलासा
'आपण लवकरच मैत्रिणी होऊ chitruuuu!'
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी ट्विट केल्यापासून उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर वॉर सुरू झाला आहे. उर्फीनं आता पुन्हा एकदा ट्विट करत, 'आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss' असं म्हणाली आहे. चित्रा वाघ यांना 'चित्रू म्हटल्याने उर्फी जावेद आणि चित्रा वाघ पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.