मुंबईत मॅरेथॉनचं आयोजन, सचिन तेंडुलकरचा फिट राहण्याचा संदेश
भारतीय क्रिकेट संघाला ही दिल्या शुभेच्छा
मुंबई : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये IDBI फेडरल लाईफ इन्सुरन्सच्यावतीनं अर्धमॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुरकरच्या हस्ते या अर्धमॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात झाली. या मॅरेथॉनमध्ये १६ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये एक हजार भारतीय जवानांचा समावेश होता.
सचिननं नागरिकांना जागरुक आणि फिट राहण्याचा संदेश दिला. याचबरोबर आशिया चषकातील कामगिरीची भारतीय क्रिकेट संघानं पुनरावृत्ती करत रहावी अशी आशाही त्यानं व्यक्त केली आहे.