मुंबई : २९ सप्टेंबर रोजी एलफिस्टनच्या फूट ओव्हर ब्रीजवर चेंगराचेंगरी झाली. ही घटना अत्यंत हृद्यद्रावक होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांनी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे केला. खासदार आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकरदेखील मुंबईकरांच्या मदतीला पुढे आला आहे.  


रेल्वेमंत्री पीयुष  गोयल यांना पत्र लिहून सचिन तेंडुलकरने मुंबईतील फूट ओव्हर ब्रिजच्या दुरूस्तीसाठी दोन करोड रूपयांची मदत केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईतील अनेक कुटुंबीयांकरिता यंदाची दिवाळी आनंददायी नसल्याचेही सचिनने स्पष्ट केले आहे. 


पार्लिमेंट लोकल एरिआ डेव्हलपमेंट स्किम अंतर्गत ब्रीजच्या दुरूस्तीच्या कामासाठी सचिनने हा निधी देत असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेसाठी १ करोड आणि पश्चिम रेल्वेसाठी १ करोड वापरला जाईल. 


दरवर्षी खासदाराला त्यांच्या विभागातील कामासाठी वापरण्यासाठी 5 करोड रूपयांचा निधी दिला जातो. सचिन या निधींचा वापर मुंबईतील ब्रीजच्या दुरूस्तीसाठी देणार आहे. 


एल्फिसटन रोड ब्रीजवरील दुर्घटनेमध्ये २३ मुंबईकरांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर अनेकांनी प्रशासनव्यवस्थेवर ताशेरे ओढले होते.