मुंबई : राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची ऊस परिषद म्हणजे यात्रेतील ढोल बजाओ आंदोलन असल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. फक्त ढोल वाजवून दर मिळत नसतो. यात्रा आल्या की ढोल बढवे बरेच येतात. मात्र आम्ही शासनापुढे ऊस दराचा प्रस्ताव ठेवला असून तो दोन दिवसात मंजूर होईल असंही त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली. 


देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन शेतक-यांना संपूर्णपणे कर्जमाफी करण्यात यावी. त्याचबरोबर उत्पादन खर्चाचा दीडपट हमी भाव मिळावा. वारंवार आदेश देऊनही एफआरपी दिलेली नाही अशा साखर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. राज्याच्या सर्व साखर कारखान्यांच्या गेट आणि गोडाऊनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा. तसंच सर्व साखर कारखान्यांची गोडाऊन आणि वजन काटे ऑनलाईन करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.