मुंबई : घटस्थापनेच्या दिवशी नव्या संघटनेची घोषणा करणार असल्याचे, राज्य कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलेय कराडमध्ये बोलताना त्यांनी हा मुहुर्त जाहीर केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावापासून २०० किलोमीटरवर जाऊन ५ लाख मतं मिळवली. हातकणंगले तर माझा घरचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक इथेच लढणार असल्याचंही खोतांनी संकेत दिला. 


येत्या 30 तारखेला  इचलकरंजी येथे दसरा मेळावा घेऊन त्या मेळाव्यातच यंदाच्या ऊस दराची घोषणा करणार आहे. तोच दर यंदाचा ऊसदर असेल असंही खोतोनी जाहीर केलं.