मुंबई : घाटकोपर इथल्या सिद्धी साई इमारत दुर्घटने प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुनिल शितप नंतर आता आणखी एकाला अटक केली आहे. अनिल मंडल असं या व्यक्तीचे नाव  आहे. त्याला विक्रोळी कोर्टात हजर केलं असता २ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धी साई इमारतीत सुनिल शितपच्या बारचं जे काम केलं जात होतं ते अनिल मंडळच्या देखरेखीखाली केले जात होते ही बाब चौकशीत समोर आली आहे. 


तसंच ग्राऊंड फ्लोअरचे पीलर आणि बीम कट करणं, त्यांचं प्लास्टर करणं, तीन रुमचा एकच मोठा हॉल बनवण्याची आयडीया सुनिल सशितप सोबतच अनिल मंडल याची होती असं पोलीस सुत्रांनी सांगितलं आहे.