मुंबई : रोजगार क्षेत्रातील सर्वात आव्हानपूर्ण वर्ष हे २०१७ होतं, यानंतर २०१८ मध्ये योग्य त्या व्यक्तींना १० ते १५ टक्के पगारवाढ मिळू शकते.


रोजगार एक आव्हान झालं होतं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीनंतर कापड उद्योग आणि दुसऱ्या परंपरागत क्षेत्रात होत असलेल्या कपातीमुळे, रोजगार एक आव्हान झालं होतं.रोजगारासंबंधी सल्ला देणारी कंपनी मॅनपावर ग्रुपने हा अंदाज बांधला होता.


नोटबंदीच्या काळात काही उद्योग होते अडचणीत


या वर्षात नोटबंदीच्या कारणावरून कापड उद्योगासारख्या पारंपरिक क्षेत्रात, तसेच कृत्रिम इंटेलीजेंसच्या कारणाने अत्याधुनिक क्षेत्रात आव्हानं आली. या कारणावरून रोजगार उद्योग या कारणासाठी हे वर्ष आव्हानपूर्ण होतं.


२०१८ मध्ये होईल सुधारणा


एका रिपोर्टनुसार, देशातील उद्योजकांकडून २०१८ मध्ये चांगल्या प्रमाणात नोकऱ्यांची मागणी होईल. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, पहिल्या तीन तिमाहीच्या मंदीनंतर, नोकऱ्या वाढल्या आहेत.


नोकऱ्या देण्याचं प्रमाण वाढत गेलं


संबंधित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात या वर्षी जानेवारी आणि मार्च या तिमाहीत, रोजगार देण्याच्या बाबतीत २२ टक्के प्रमाण कमी झालं होतं. एप्रिल- जून या तिमाहीत हे प्रमाण १९ टक्क्यांवर आलं. 


या नंतर रोजगार देण्यात आणखी वाढ झाली, हे प्रमाण जुलै आणि सप्टेंबरच्या तिमाहीत १६ टक्के झालं. मात्र यानंतर ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत हे प्रमाण २४ टक्के वर आलं. म्हणजे नोकऱ्यांची मागणी तुलनेने वाढली. यावरून नोकरीपेशात असणाऱ्यांना १० ते १५ टक्के वाढीची शक्यता वाढली आहे.