समाजवादी पार्टीच्या माजी नगरसेविकेची आत्महत्या
समाजवादी पक्षाच्या माजी नगगरसेविका नूरजहां रफीक शेख यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. नूरजहाँ या समाजवादी पक्षाकडून शिवाजी नगर, गोवंडी विभागातून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
मुंबई : समाजवादी पक्षाच्या माजी नगगरसेविका नूरजहां रफीक शेख यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. नूरजहाँ या समाजवादी पक्षाकडून शिवाजी नगर, गोवंडी विभागातून दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
नूरजहाँ रफीक शेख यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल का उचलले याचा अद्याप तपास लागलेला नाही. नूरजहाँ रफीक शेख यांचे पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले असून याबाबतचा पुढील तपास सुरु आहे.
समाजवादी पक्षाच्या नूरजहाँ आपल्या पतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे अधिक चर्चेत होत्या. दरम्यान त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीये.