Mumbai Drugs Case : समीर वानखेडे यांनी का घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट?
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांची भेट घेतली
Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drug Case) चर्चेत आलेले एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांची भेट घेतली. तब्बल 25 मिनिटं ही भेट चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जात प्रमाणपत्राशी संबंधीत चौकशीसाठी समीर वानखेडे यांना बोलावण्यात आलं होतं.
मुंबई पोलिसांची एसआयटी ड्रग्स प्रकरणात झालेल्या कथित वसूलीचा तपास करत आहे. तर मुंबई पोलिसांची दुसरं पथक जास्त प्रमाणपत्राशी संबंधीत तपास करत आहे. एनसीबीचं दक्षता पथकही वसूलीसंदर्भातील आरोपांचा तपास करत असून समीर वानखेडे यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
समीर वानखेडेंवर वसूलीचा आरोप
समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीच्या पथकाने 2 ऑक्टोबरला मुंबईत क्रूझवर छापेमारी करत ड्रग्स बाळगल्याचा आरोप करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह मॉडेल मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट आणि इतर काही लोकांना अटक केली होती. या कारवाईवरुन या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने समीर वानखेडे यांच्यावर केपी गोसावीसोबत (Kiran Gosavi) मिळून वसूलीचा आरोप केला होता.
नवाब मलिक यांच्याकडून आरोपांची मालिका
याशिवाय महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. तसंच समीर वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मांतर केल्याचाही आरोप करत समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीच्या कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
या आरोपांनंतर एनसीबीने समीर वानखेडे यांची आर्यन खान प्रकरणासोबत सहा प्रकरणावरुन उचलबांगली केली. या प्रकरणाचा तपास एनसीबीच्या केंद्रीय पथकाकडे सोपवण्यात आला आहे.