मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज आणखी एक पेनड्राईव्ह बॉम्ब विधानसभेत फोडला. वक्फ बोर्ड सदस्य डॉ. मुदस्सिर लांबे आणि मोहम्मद अर्शद खान यांचे माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप फडणवीस यांनी केला. त्यांच्यातल्या संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्हच त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. मुदस्सीर लांबेविरोधात एका ३३ वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. यानंतर लांबेने या महिलेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. 


देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी उत्तर दिलं आहे. सना मलिक यांनी एक ट्विट केलं असून यात देवेंद्र फडणवीस आणि मुदस्सीर लांबेचा फोटो आहे. या फोटोखाली सना मलिक यांनी अर्धसत्य हे पूर्ण खोटं असतं असं म्हटलं आहे.


सना मलिक यांनी काय म्हटलंय
डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारच्या काळात 13 सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार हे नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेत आलं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्यांक आणि वक्फ विभाग जानेवारी 2020 मध्ये आलं. डी गँगचा नातेवाईक आणि बलात्काराचा आरोपी देवेंद्र फडवीसांबरोबर असं ट्विट सना मलिक यांनी केलं आहे.