संजय देशमुखांची इतक्यात शिक्षा संपणार?
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना ऑनलाईन असेसमेंटच्या वादग्रस्त निर्णयानंतर ९ ऑगस्टपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र आता रजा संपली असून पुन्हा रुजू होण्याची इच्छा देशमुखांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना ऑनलाईन असेसमेंटच्या वादग्रस्त निर्णयानंतर ९ ऑगस्टपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मात्र आता रजा संपली असून पुन्हा रुजू होण्याची इच्छा देशमुखांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात देशमुख यांनी यांनी कुलपतींना पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. मात्र पत्र पाठवून १५ दिवस उलटले तरी राजभवन कार्यालयातून संजय देशमुख यांना कोणतेही उत्तर देण्यात आलं नसल्याचं उघड झालंय.
तर दुसरीकडे संजय देशमुख कुलगुरु पदावर पुन्हा रुजू होण्यासाठी जोरदार लॉबिंग करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असली तरी निकालांमध्ये प्रचंड मोठ्या चूका आहेत. त्यामुळे संजय देशमुख यांच्याबाबतीत कुलपती सी विद्यासागर राव काय निर्णय घेतात याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.