धक्कादायक, `५०० कोटी रूपये किंमतीचा आरक्षित भूखंड मूळ मालकाला परत`
जोगेश्वरीमधल्या ५०० कोटी रूपये किंमतीचा आरक्षित भूखंड मूळ मालकाला परत मिळवून देण्यात, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांचा महत्वाचा वाटा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. याप्रकरणी निरुपम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
मुंबई : जोगेश्वरीमधल्या ५०० कोटी रूपये किंमतीचा आरक्षित भूखंड मूळ मालकाला परत मिळवून देण्यात, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांचा महत्वाचा वाटा असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. याप्रकरणी निरुपम यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
१० वर्षं आरक्षित असलेला भूखंड मिळवण्यात बीएमसी अपयशी ठरल्यानंतर, मूळ मालकाने तो भूखंड परत मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावेळी बीएमसीनं न्यायालयात योग्य बाजू न मांडल्यानं, ती जमीन मूळ मालकाला परत करण्याचे आदेश न्यायालयानं बीएमसीला दिले होते. हा आरक्षित भूखंड मूळ मालकाला देण्यात पालिका आयुक्तांचा हात असल्यानं, त्यांची चौकशी करण्याची मागणी निरुपम यांनी केलीय.