संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रमुख नेते शरद पवारांच्या घरी
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान सिल्व्हर ओकला पोहोचलेले आहेत. यामुळे शरद पवारांचं निवासस्थान हे राजकीय घडामोंडींचं केंद्र झाल्यासारखं आहे. संजय राऊत यांच्याशिवाय काँग्रेसचे नेते देखील सिल्व्हर ओकला पोहोचले आहेत.
शरद पवारांच्या निवासस्थानी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे हे देखील पोहोचले आहेत. यानंतर शरद पवार हे पत्रकार परिषद घेतील असं सांगण्यात येत आहे.
भाजप आणि शिवसेना यांची महायुती मुख्यमंत्री कुणाचा या मुद्द्यावर सध्या संपुष्टात आल्याचं चित्र आहे. शिवसेना आणि भाजप एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच यावर शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.