मुंबई: शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भाजपवर वार केला. राऊत यांनी एक ट्विट करून भाजपला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मत पालिए, अहंकार को इतना, वक़्त के सागर में कईं सिकन्दर डूब गए..!, अशा आशयाचे हे ट्विट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राऊत यांच्या या टीकेचा रोख भाजपच्या दिशेने आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून आपल्याला १४० जागा मिळतील, असा दावा केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला अवघ्या १०५ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे एकहाती सत्ता स्थापन करून शिवसेनेला काबूत ठेवण्याचे भाजपचे मनसुबे उधळले गेले होते. 


संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट


त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर जागावाटपात तडजोड करणाऱ्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तेच्या समसमान वाटपासाठी आग्रह धरला आहे. मात्र, आम्ही शिवसेनेला असे कोणतेही वचन दिले नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेची मागणी धुडकावून लावली होती. यानंतर भाजपकडून एकट्यानेच सरकार स्थापन करायची तयारी सुरु असल्याची माहितीही पुढे आली होती. 


आपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे


मात्र, शिवसेनेनेही या लढाईतून माघार घ्यायला नकार दिला होता. ठरलेली भूमिका भाजपने बदलली. ठरल्याप्रमाणे चर्चा व्हायला हवी. आमचं पाऊल मागे जाणार नाही. हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला ठणकावले होते. 



दरम्यान, गुरुवारी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे नवी राजकीय समीकरणे उद्याला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.