मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या मुलीचा साखरपुडा १ फेब्रुवारी २०२१ रोजी पार पडला. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut)  आणि मल्हार नार्वेकर यांचा साखरपुडा झाला आहे. (Sanjay Raut Daughter Purvashi Raut Engagement Video)  लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या साखरपुड्याच्या व्हिडिओ समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या साखरपुड्यातील संजय राऊत आणि पूर्वशीचा बाप-लेकीचं अतुट नातं सांगणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून त्या दोघांचं नातं किती वेगळं आहे याची जाणीव झाला. आता साखरपुड्याचा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हि़डिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 


अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहून नजरेचं पारण फिटेल यात शंका नाही. अतिशय सुंदर असा हा सोहळा पार पडला. पूर्वशी आणि मल्हार यांचा साधेपणाने अधोरेखित होत होता. या सोहळ्याला अनेक मान्यवरांची मांदियाळी जमली होती. 


कोण आहेत संजय राऊतांचे व्याही?


 ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे राजकारणातील पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.


मल्हार आयटी इंजीनियर


नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.


हा भव्य सोहळा ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे.