मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये (Aurangabad) गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण आता चांगलंच तापलं आहे. मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम असल्याने गृहविभागही सतर्क झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात, कायद्याचं उल्लंघन कोण करत असेल, मग ती व्यक्ती कितीही मोठी असू द्या त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. 


चिथावणीखोर, भडकाऊ भाषण देत असतील तर गुन्हे दाखल होत असतात, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचं राज्य आहे. राज्याच्या बाहेरून गुंड प्रवृत्तीची लोकं आणून गडबड करायची, ज्यांची ताकद नाही अशी लोकं सुपारीचं राजकारण करतायत असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. 


मुंबई आणि राज्याचे पोलीस सक्षम आहे, गृहविभागाचं सर्व घडामोडींवर लक्ष आहे. त्यामुळे चिंता करण्याची गोष्ट नाही. अल्टिमेटमवर राज्य चालत नाही, आपल्या यंत्रणा सक्षम आहेत, नेतृत्व भक्कम आहे, राज्य अस्थिर करण्याचा कोण प्रयत्न करत असेल, तर ते सर्वात मोठी चूक करत आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.