आताची मोठी बातमी! संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता, दादरच्या घरीही ईडीचा छापा
ईडी कार्यालय आणि संजय राऊतांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला
Sanjay Raut ED Inquiry : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणात (Patrachawl Scam) ईडीचे (ED) अधिकारी सकाळी सव्वासात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या भांडूप इथल्या घरात चौकशी करत आहेत.
दरम्यान, आताच मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या दादरमधल्या घरातही ईडीने छापा टाकला आहे.
ईडी कार्यालयाबाहेर आणि संजय राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ब्रिफिंग केलं आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांना घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. त्यांना रोखण्यासाठी बॅरिगेंटिक करण्यात आलं आहे.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकासासाठी गुरूआशिष कन्स्ट्रक्शनचा म्हाडासोबत करार
पत्राचाळीच्या ठिकाणी 3 हजारांहून अधिक फ्लॅट बांधायचे होते
एकूण फ्लॅटपैकी 672 फ्लॅट पत्रा चाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते
उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि गुरूआशिषकडे राहणार होते
बांधकाम न करता गुरूआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून म्हाडा आणि पत्रा चाळीतील रहिवाशांची फसणूक
गुरूआशिष कन्स्ट्रक्शनने ही जमीन 1 हजार 34 कोटींना दुस-या बिल्डरला विकली