मुंबई : मी बाळासाहेबांमुळे पत्रकार, नंतर सामनाचा संपादक आणि खासदार झालो, शिवसेनेचा नेता, चित्रपट निर्मितीतही बाळासाहेबांच्याच प्रेरणेमुळे आलो, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, बाळासाहेबांवरील बायोपिक सिनेमाच्या टीझर रिलीज प्रसंगी सांगितलं.


बाळासाहेबांनी मला पत्रकाराचं खासदार केलं-संजय राऊत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मागील 50 वर्षापासून बाळासाहेबांच्या सावलीत आपण वाढलो, बाळासाहेबांचं आयुष्य पारदर्शी होतं, भारतीय राजकारणाचे ते महानायक होते.



गांधी किंवा नेल्सन मंडेला यांच्यावरील सिनेमा, मी जेव्हा जेव्हा पाहत होतो, तेव्हा वाटायचं बाळासाहेबांवर, बायोपीक व्हावं, बाळासाहेब ठाकरे एकदा जन्माला येतात, आम्ही भाग्यशाली आहोत, आम्ही बाळासाहेब पाहिले आहेत. त्यांच्याकडून खूप काही शिकलो.


मी यावेळी या सिनेमाबद्दल एवढंच सांगेन, या फक्त सिनेमाचा टीझर आहे, सिनेमा अजून बाकी आहे, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं.