मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. या अधिवेशनात अनेक मुद्दे गाजण्याची दाट शक्यता आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Opposition before Maharashtra Assembly Budget Session 2021)  यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यावरूनच हे अधिवेशन चांगलच गाजेल असं दिसून येत आहे. 


काय म्हणाले संजय राऊत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विरोधकांनी आज अधिवेशनात घेरण्यापेक्षा जो अधिवेशनाचा वेळ आहे, त्यात काही विषयावर चर्चा घडवल्या तर महाराष्ट्रसाठी फायदेशीर ठरेल असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. विरोधकांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे असं नाही असाही टोला त्यांनी मारला. राज्यपालांनी पेंडींग विषय मार्गी लावावे असंही राऊत यांनी सुनावलं आहे.  


अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन 


इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज जोरदार एल्गार पुकारला. काँग्रेस आमदार अधिवेशनाआधी मुंबईत हुतात्मा चौकात एकत्र आले. तिथे फलक झळकावत काँग्रेस आमदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस आमदार हुतात्मा स्मारकापासून सायकल मोर्चा काढत अधिवेशनासाठी जाणार आहेत. मात्र हे आंदोलन करत असताना काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फासत कोरोना नियमांची पायमल्ली केलीय. काँग्रेस आमदारांनी मास्क लावला नव्हता, तसंच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे आंदोलन करताना काँग्रेस आमदारांनी हे नियम का पाळले नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे.