मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या. तुम्ही गप्प राहू नका. संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या तुफान झटापटीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांनी परिसरातून आपले सैन्य माघारी बोलावले आहे. भारतीय लष्कराकडून यांसदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी २० जवान शहीद झाले आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून ट्विट केलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, चीनला कधी मिळणार चोख उत्तर? शस्त्र न उचलूनही आपले २० जवान शहीद झाले. आपण काय केलं आहे? त्यांचे किती जवान मारले गेले? चीन आपल्या देशात घुसघोरी करत आहे. पंतप्रधान मोदीजी या संघर्षाच्या काळात देश तुमच्यासोबत आहे. पण खरं काय आहे? तुम्ही बोला. देशाला खरं जाणून घ्यायचं आहे. जय हिंद असं म्हणत त्यांनी दुसरं ट्विट केलं आहे. 



१५ आणि १६ जूनला भारतीय आणि चिनी सैनिक एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही बाजूचे अनेक जवान गंभीर जखमी झाले. आज दुपारीच भारताच्या एका कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, काहीवेळापूर्वीच उपचारादरम्यान आणखी १७ भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शहीदांचा आकडा २० वर पोहोचला आहे.