मुंबई : एंटीलिया प्रकरणाचं टोक आता महाराष्ट्र सरकारकडे वळली आहे. मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची खुर्ची धोक्यात आली  आहे.  महाराष्ट्र आघाडी सरकारमध्ये मोठा भूकंप आला आहे. या दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Tweet on Political Situation)  यांनी रविवारी सकाळी आपला शायराना अंदाज दाखवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी गीतकार जावेद अख्तर यांची शायरी ट्विट केली आहे. 'शुभ प्रभात', हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है..'



गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप 


हे प्रकरण सचिन वाझे आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभवती फिरत आहेत. या प्रकरणाचा मोठा फटका महाराष्ट्र सरकारवर होणार आहे. मुंबई पोलीस कमिश्नरपदावर नुकतेच नियुक्त झालेले परमवीर सिंह यांनी मुख्यमत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे. 


या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत की, त्यांनी सचिन वाझेंकडून १०० कोटी रुपये महिन्यात कलेक्ट करण्यास सांगितले होते. यावर अनिल देशमुखांनी ट्विट करत म्हटलं होतं की,'परमबीर सिंह यांनी स्वतःला कारवाईपासून लांब ठेवण्यासाठी असे आरोप केले आहेत.'


देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी 


अनिल देशमुख यांचं नाव समोर आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तात्काळ राजीनामा देऊन चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.