मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजित पवार यांनी ट्विट केलेल्या सूचक छायाचित्रामुळे राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, छायाचित्रात स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात असलं तरी त्यांना गाड्या आम्ही पुरवतो. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या गोटातून यावर काही प्रतिक्रिया दिली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पॉवर' स्टेअरिंग हाती घेत अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तसेच उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याची गरज असल्याचेही राऊत यांनी सांगितले. मराठाविना राष्ट्र गाडा न चाले हे विनोबा भावेंचं वाक्य आजही का चालतं? आज देशाच्या राजकारणामध्ये एक पोकळी निर्माण होताना दिसते. शरद पवार यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व करावं,  त्याच्यात त्या क्षमता आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राष्ट्राचा चेहरा असतो, राष्ट्रचं राज्यावर लक्ष असते. आता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालायला हवे, असे राऊत यांनी म्हटले. 


'आम्हाला काय म्हणायचं हे अजितदादांनी फोटोतून दाखवून दिलंय'



मात्र, उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय नेतृत्व करावं म्हणजे महाराष्ट्रात लक्ष न द्यावं असं नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपद सांभाळूनही राष्ट्रीय राजकारण करता येते. उद्धव ठाकरेंमध्ये ती धमक आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.