शिवसेनेने ठरवलं तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री- संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, ही पत्रकार परिषद संजय राऊत
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली, देवेंद्र फडणवीस यांची टीव्हीवरील पत्रकार परिषद संजय राऊत यांनी शरद पवारांच्या घरी पवारांसोबत बसून ऐकली. शरद पवारांच्या घराबाहेर आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, जर भाजपा त्यांचं सरकार बनवत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा. तसेच शिवसेनेने ठरवलं तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असं देखील यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.
तसेच मुख्यमंत्री ज्या प्रकारे म्हणाले की शिवसेनेच्या नेत्यांकडून पंतप्रधान आणि आमच्या नेत्यांचा अनादर झाला, तर तो आम्ही कधीच केला नाही. आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा अनादर केला नाही. उलट ज्यांनी भाजपा नेत्यांवर टीका केली, त्यांच्यासोबत काही ठिकाणी भाजपाने सरकार स्थापन करून, मांडीला मांडी लावून ते काम करत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत निक्षून सांगितलं की, यापुढे जे कोणतं सरकार बनेल, ज्या कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, तर तो भाजपचाच होणार आहे, असा दावा केला आहे. याच दाव्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी 'तुमचं सरकार बनत असेल तर शुभेच्छा', असं उत्तर दिलं आहे.