मुंबई : संजय राऊत यांनी रोखठोक विरोधकांना ''ही XXXतेगिरी बंद करा...नाहीतर तुमचं सरकार कधीच येणार नाही'' , असं म्हटलं होतं, शरद पवार हे समोरुन येत असताना एक लाकडी खुर्ची शरद पवारांना संजय राऊत देत आहेत, असा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर शरद पवार हे तुमचे गुरु आहेत हे आम्हाला आज समजलं, आतापर्यंत बाळासाहेब वाटत होते, असं ट्ववीट एका आमदाराने केल्यानंतर, संजय राऊतांनी ''ही XXXतेगिरी बंद करा...नाहीतर तुमचं सरकार कधीच येणार नाही'' हे उत्तर दिलं होतं.


पण विषय येथेच संपला नाही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत घाणेरडे शब्द वापरत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपा मोट बांधताना दिसली, पण लगेच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींचा एका व्हीडीओ ट्ववीट केला. त्यात “दुनिया में चु*** कमी नही, जरा योगिजी को सुनिये,” असा व्हीडिओ संजय राऊतांनी ट्वीट केला.


आणि ही xतेगिरी बंद करा - संजय राऊत


"बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला हा संस्कार दिला आहे. बाळासाहेब हेच गुरु आणि यशवंतराव चव्हाण हेच आमचे आदर्श आहेत. मोठ्यांचा आदर करणे ही संस्कृती आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण चालत नाही, आणि ही xतेगिरी बंद करा. पुन्हा सांगतो ही xतेगिरी बंद करा. "


अशाने तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही - संजय राऊत


अशाने तुमचं राज्य महाराष्ट्रात कधीच येणार नाही. विकृती तुमच्या डोक्यात, कचरा आहे तुमच्या डोक्यात आहे. हा कचरा तुम्ही साफ केला नाही, तर एखाद्य डंम्पिग ग्राऊंडमध्ये लोक तुम्हाला गाडून टाकतील.