मुंबई : भविष्यात भाजपा सोशल मीडियावर कंट्रोल आणण्यासाठी कायदा करण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. याआधी काँग्रेस पंतप्रधानांची खिल्ली उडवली जात होती त्यावेळेस काही होत नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तरूणांनी सरकारला प्रश्न विचारले तर गुन्हेगार ठरविलं जातं. हा संपूर्ण प्रकार शिवसेना कदापी सहन करणार नाही. तर सोशल मीडियावर निर्बंध लादणा-या कायद्याला शिवसेना विरोध करेल असंही खासदार संजय राऊत यांनी ठणकावलं.


पाठिंब्यावर शिवसेनेत आजही संभ्रमावस्थेत?


भाजपवर शिवसेनेनं कितीही टीका केली, तरी राज्य सरकारचा पाठिंबा काढण्यावरून मात्र, शिवसेनेत आजही संभ्रमावस्थाच असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.


सरकारचा पाठिंबा काढण्याचा मुहूर्त कधी येणार असं विचारलं असता मुहूर्त प्रसारमाध्यमांनी स्वतःच काढला होता असं प्रत्त्युत्तर देत, शिवसेनेच्या एकाही नेत्यानं पाठिंबा काढू असं कधीच म्हंटलं नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे शिवसेनेचा संभ्रम पुन्हा दिसून आला आहे. 


पिंपरी चिंचवड शहरातल्या तीन विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिका-यांची बैठक झाली. त्यावळी संजय राऊत यांनी ही भूमिका मांडली.