व्हीडिओ | रश्मिका मंधानाची `मराठीत कंबर लचकली` पाहा कशी?
हा व्हीडिओ सोशल मीडियावर `बेक्कार` व्हायरल झाला आहे.
मुंबई : सध्या जिथं बघावं तिथं पुष्पा आणि पुष्पाचाच फिव्हर पाहायला मिळतोय. पुष्पाने बॉक्स ऑफिसवर राडा केलाय. तसंच त्यापेक्षा दुप्पट अगदी कितीतरी पट राडा सोशल मीडियावर घातला आहे. 'सामी सामी', या गाण्यावर नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंधानाने जो काही धमाकेदार डान्स केलाय त्याला तोड नाय बघा. (sanket kadam makes video memes on pushpa sami sami with background music marathi nachu kiti kambar lachakali song)
नेटीझन्सने 'सामी सामी' गाण्यावर रिल तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले. पण यापेक्षा आणखी पुढे असलेल्या मीमर्स मंडळीने अक्षरक्ष: राडा घातलाय राव.
मीमर मंडळी कधी काय करतील याचा नेम नाय. अशाच एका मीमरने रश्मिकाच्या डान्सच्या व्हीडिओला आपल्या मराठीतील 'नाचू कशी कंबर लचकली' हे गाणं दिल जोडून. मग काय, जाळ अन धुर संगटच. भावा व्हीडिओने राडा घाताला ना सोशल मीडियावर.
संकेत कदम या पठ्ठ्याच्या सुपीक डोक्यातून हा अफलातून आणि तितकाच भन्नाट व्हीडिओ साकारण्याची आयडिया आली. त्यानुसार त्याने जगदीश खेबुकरांचे बोल असलेला, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या, आशा भोसलेंचा आवाज असलेल्या या गाण्यासह रश्मिकाची थिरकणारी कंबर दिली जोडून अन् पुढे जे झालं ते फायनल प्रोडक्ट आहे तुमच्यासमोर.
आम्ही मिमकर या मीमर्स मंडळीच्या फेसबूक ग्रृपवर हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. या ग्रृपवर ट्रेंडनुसार, असेच भन्नाट व्हीडिओ आणि मीम्स तयार केले जातात.